सुषमा अंधारे यांच्यावर केलेली टीका संजय शिरसाट यांना भोवणार? महिला आयोगानं घेतली दखल
VIDEO | शिवसेना आमदार संजय शिरसाट विरोधात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे भडकल्या, 'त्या' वक्तव्याप्रकरणी तक्रार, महिला आयोगाकडून दखल
मुंबई : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधील मेळाव्यात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होते. याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. दरम्यान, या तक्रारीची महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी महिला आयोगाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून संजय शिरसाट यांचे व्हिडीओ महिला आयोगाने मागवले आहेत. यावरून संजय शिरसाट यांनी केलेलं वक्तव्य तपासून महिला आयोग पुढचे निर्देश देण्याची शक्यता असून आयोगाकडून आता कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. ‘हे माझे भाऊ आहेत. ते माझे भाऊ आहेत. काय काय लफडी केलीत ते तिलाच ठावूक असं वादग्रस्त व्यक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं होतं. आम्ही ३८ वर्षे शिवसेनेत घालवली. तू आहे कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आता तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करता. राजकारणात कधी काहीही घडतं’. शिरसाट यांच्या या वक्तव्याने नवा वाद उपस्थित झाला आहे.
Published on: Mar 28, 2023 03:45 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
