काँग्रेसबद्दल अंधारे यांचे सुटक वक्तव्य; ‘काँग्रेसला अच्छे दिन…’ तर भुजबळ यांच्याबद्दल म्हणाल्या,
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांच्या जाण्याने महाविकास आघाडी फूटली असे म्हटलं जाऊ लागलं आहे. तर अजित पवार यांच्या जाण्याने आता मविआत काँग्रेसचे महत्व वाढले आहे.
नांदेड : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील २० पेक्षाही अधिक आमदार घेऊन बंडखोरी केली. तर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांच्या जाण्याने महाविकास आघाडी फूटली असे म्हटलं जाऊ लागलं आहे. तर अजित पवार यांच्या जाण्याने आता मविआत काँग्रेसचे महत्व वाढले आहे. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर निशाना साधताना, काँग्रेसबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी, काँग्रेसची क्रेडीबीलेटी आता लोकांना पटत आहे, काँग्रेसला चांगले दिवस येणार. त्या सोबतच महाविकास आघाडीला चांगले दिवस येणार असल्याचे अंधारे यांनी म्हटलं आहे. तर यासाठी फक्त आम्हाला गरज आहे आम्ही अजून लोकांपर्यंत जायची, नुसतच दिवस चांगले असं म्हणत न राहता त्या लोकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे. तर शिंदे गटावर टीका करताना राजकीय नैतिकता हरवत चालली आहे. आमचे चुकार भाऊ बाहेर जाऊन म्हणाले होते की, राष्ट्रवादी सोबत गेल्यावर हिंदुत्व धोक्यात येत, आता त्याचं हिंदुत्व कोणत्या प्रोटेक्टिव्ह कव्हर मध्ये ठेवलं माहीत नाही, ते आता धोक्यात येत नाही का असा सवाल करताना, अजित पवारांकडं पाहून म्हणायले आम्हाला निधी मिळताच नव्हता, म्हणून आम्ही बाहेर पडलो. जी सासू नको नको म्हणाले तीच सासू वाट्याला आली. आता तेच अजित पवार अर्थ खात सांभाळणार आहेत. काय नैतिकतेचा आधार असेल बर, अजित पवार यांना अर्थ खात मिळालं त्यांना शुभेच्छा, प्रशासनावर पकड असणारा माणूस मिळाला, पण मला चळवळीतली म्हणून वाईट वाटत ते छगन भुजबळ याचं, ज्या भुजबळ साहेबांनी आम्हाला आयुष्यभर चळवळीचा एक विचार सांगितला त्यांच्याकडून आम्हाला वेगळ्या अपेक्षा होत्या, हे राजकीय म्हणून नाही, हे चळवळीतले म्हणून इथं सांगत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Published on: Jul 15, 2023 12:53 PM
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी
