Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Election Result : अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा

Delhi Election Result : अहंकार रावण का भी नहीं बचा था – स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा

| Updated on: Feb 08, 2025 | 1:30 PM

आपचे प्रमुख , दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही पराभवाचा मोठा फटका बसलाय. भाजपच्या परवेश शर्मांनी केजरीवाल यांचा दारूण पराभव केला आहे. याच दरम्यान स्वाती मालिवाल यांनी एक अतिशय सूचक ट्विट केलं आहे."

दिल्ली विधानसभा निवडणुकांचा निकाल समोर येत असून सत्ताधारी आम आदमी पक्षाला जबर धक्का देत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. राजधानी दिल्लीत 27 वर्षांनी भाजपचा कमळ फुलताना दिसत असून मतदारांनी भाजपला भरघोस मतदान केलं आहे. भाजप 48 तर आप 22 जागांवर आघाडीवर असून आपचे प्रमुख , दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही पराभवाचा मोठा फटका बसलाय. भाजपच्या परवेश शर्मांनी केजरीवाल यांचा दारूण पराभव केला आहे. याच दरम्यान स्वाती मालिवाल यांनी एक अतिशय सूचक ट्विट केलं आहे.” अहंकार रावण का भी नहीं बचा था ” यांनी X या सोशल मीडिया साईटवर ही पोस्ट करत टोला लगावला आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या पराभवानंतर स्वाती मालिवाल यांचं हे ट्विट अतिशय बोलकं आहे. स्वाती मालिवाल यांनी अरविंद केजरीवाल यांच्या स्वीय सहायकावर काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. त्यानंतर बराच गदारोलही झाला होता. आता दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत असून केजरीवाल यांना पराभवाचा धक्का बसला असून त्यातच मालिवाल यांनी या पोस्टमधून निशाणा साधला आहे.

Published on: Feb 08, 2025 01:28 PM