AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'बरं झालं त्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला...', विधानभवनात सूर्याच्या कॅचवरून रोहित शर्माचा मिश्किल टोला

‘बरं झालं त्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला…’, विधानभवनात सूर्याच्या कॅचवरून रोहित शर्माचा मिश्किल टोला

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Jul 05, 2024 | 5:44 PM
Share

Rohit Sharma on Suryakumar yadav : विधानभवनातील सत्कार सोहळ्यातील कार्यक्रमात कर्णधार रोहित शर्माने सूर्यकुमार यादव याने फायनलच्या ग्राऊंडवरील बॉड्रीवर घेतलेल्या कॅचबाबत एक लक्षवेधक प्रतिक्रिया दिली. रोहित शर्माच्या या मिश्किल मनोगतानंतर विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये एकच हस्यकल्लोळ पाहायला मिळाला

टी 20 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील चार मुंबईकर खेळाडूंचा मुंबईतील विधानभवनात आज सन्मान करण्यात आला. विधानभवनात टीम इंडियाचा कर्णाधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या चौघांच्या नावाचाच जयजयकार आजही पाहायला मिळाल. विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये भारतीय संघातील या चार मुंबईकर खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या भावना व्यक्त करत सर्वांचेच आभार व्यक्त केले. विधानभवनातील सत्कार सोहळ्यातील कार्यक्रमात कर्णधार रोहित शर्माने सूर्यकुमार यादव याने फायनलच्या ग्राऊंडवरील बॉड्रीवर घेतलेल्या कॅचबाबत एक लक्षवेधक प्रतिक्रिया दिली. रोहित शर्मा म्हणाला “मिळालेलं यश संपूर्ण टीम इंडियाचं आहे. आणि त्यावेळी बरं झालं सूर्यकुमारच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला आम्ही बसवला असता”, असं म्हणत रोहित शर्माने मिश्किल भाष्य करत त्याला टोला लगावला. रोहित शर्माच्या या मिश्किल मनोगतानंतर विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये एकच हस्यकल्लोळ पाहायला मिळाला.

Published on: Jul 05, 2024 05:44 PM

Follow Us
Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या...

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या..

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !.

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा.

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक