Tamilnadu Vidhansabha Election Results | तमिळनाडूत मोठा राजकीय धक्का; विजयच्या टीव्हीकेची आघाडी, डीएमके तिसऱ्या स्थानी
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीचे कल धक्कादायक ठरत असून, राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. अभिनेता ते राजकारणी विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाने अनपेक्षितपणे आघाडी घेतली असून, पहिल्याच निवडणुकीत दमदार कामगिरी नोंदवली आहे.

तर सत्ताधारी डीएमके (DMK) आणि मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. एक्झिट पोलचे अंदाज फोल ठरवत टीव्हीके सध्या सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येताना दिसत आहे, तर डीएमके तिसऱ्या स्थानी गेल्याचे सुरुवातीच्या कलांमधून स्पष्ट होत आहे. टीव्हीकेच्या कार्यालयात कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू असून, राज्यात सत्ताबदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील मतमोजणीतही चुरस वाढली आहे. येथे भाजप 138 जागांवर आघाडीवर असून बहुमताच्या 148 या आकड्यापासून केवळ 10 जागा दूर आहे. तर टीएमसी (TMC) 129 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
एकूणच, सुरुवातीच्या कलांमुळे देशाच्या राजकीय चित्रात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त होत असून, अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: May 04, 2026 11:01 AM
व्हॉट्सअप केलं, व्हीप जारी केला अन् फोनही... संजय राऊतांनी बैठकीआधीच द
Omraje Nimbalkar | काऊंट डाऊन स्टार्ट! 11 वाजता सगळंच कळेल; सही न करणा
तोडून दाखवा! नाही तोडलं तर शिवसेना आमच्या बापाचं नाव नाही
मुंबईच्या समुद्रकिनारी मोठा गोंधळ! तुपकरांच्या आंदोलनाला तीव्र वळण;