Latur News : टीसी काढण्यासाठी 200 रुपये मागितले, विद्यार्थ्याने पावती मागताच जे झालं ते..
Latur School Video : टीसी काढण्या वादातून लातूरच्या अहमदपुरमधील शाळेत हाणामारी झाली असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
लातूरच्या अहमदपुरमधील शाळेत टीसी काढण्याच्या वादातून हाणामारी झाली आहे. शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या भावाची हाणामारी झालेली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आलेला आहे. टीसी काढण्यासाठी गेलेल्या भावाकडून 200 रुपये मागितले. विद्यार्थिनीच्या भावाने पावती मागितल्याने हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे.
शाळेत बहिणीचा टीसी काढण्यासाठी गेलेल्या भावाकडून शिक्षकाने 200 रुपये मागितले. त्यावर भावाने या पैशांसाठी पावती मागितली. त्यानंतर वाद सुरू झाला आणि या विद्यार्थिनीच्या भावाची आणि शिक्षकाची चांगलीच हाणामारी झालेली बघायला मिळाली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद झालेला आहे. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला असून त्यानंतर या शिक्षकांवर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

