Pahalgam Terror Attack : ‘पहलगाम’चा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन अन् आर्मीचा कमांडो, काय होता डाव?
हाशिम मुसा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मुसाने स्थानिक दहशतवाद्यांसह हल्ला घडवून आणल्याची माहिती आहे. मुसाचे पाक सैन्याशी थेट संबंध असून तो पूर्वी पॅरा कमांडो होता, अशी मोठी माहिती मिळतेय.
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाशिम मुसा असून तो पाक आर्मीचा माजी कमांडो असल्याची माहिती समोर येतेय. पहलगाममध्ये हाशिम मुसानें इतर दहशतवाद्यांना सोबत घेत पर्यटकांवर गोळीबार केला. लष्कर ए तोयबाने मुसाला जम्मू-काश्मीर मध्ये पाठवलं होतं. हल्ल्याआधी मुसाने पहलगाममध्ये रेकीही केली होती. हल्ल्याच्या आधीचा काही दिवसांपूर्वीचा मुसाचा एक व्हिडिओ एका पर्यटकाच्या मोबाईल मध्ये कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये मुसा हा पहलगाममध्ये दुसऱ्या एका अतिरेक्यासोबत रेकी करण्यासाठी आल्याचं दिसतं. यानंतर आता पहलगाम हल्ला घडवून आणणारा दहशतवादी हाशिम मुसाची कुंडली बाहेर आली आहे.
हाशिम मुसा हा आधी पाकिस्तानी सैन्यात कार्यरत होता. पाकिस्तानी सैन्याच्या स्पेशल ग्रुपमध्ये हाशिम मुसा कमांडो होता. सध्या तो लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेमध्ये काम करतो. हाशिम मुसाचा पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयशी देखील थेट संबंध आहे. आयएसआयने मुसाला लष्कर ए तोयबा संघटनेमध्ये सहभागी करून घेतलं होतं. आयएसआयनें मुसाला गुप्त कारवायांच प्रशिक्षण दिल्याचही बोललं जातंय. हल्ल्यावेळी मुसा आणि त्याच्या साथीदारांनी कोणालाही संशय येऊ नये म्हणून लष्करी गणवेश परिधान केला होता. हल्ल्यानंतर मुसा त्याच्या इतर साथीदारांसह पहलगामच्या घनदाट जंगलात पळून गेलाय. भारतीय सुरक्षा दल सध्या मुसाच्या मागे आहे.
Published on: Apr 29, 2025 07:29 PM
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
