TET Scam : अब्दुल सत्तार मंत्री असताना घोटाळा, चौकशी व्हावी, आमदार अंबादास दानवेंची मागणी
'सत्तार मंत्री असताना घोटाळा झाला आहे. त्यामुळे चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार अंबादास दानवेंनी केली आहे. ईडीकडून (ED) देखील या प्रकरणाची समांतर चौकशी सुरू आहे. सविस्तर वाचा...
औरंगाबाद : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अर्थात टीईटीमध्ये घोटाळा (TET Scam) प्रकरणात शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यावर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘सत्तार मंत्री असताना घोटाळा झाला आहे. त्यामुळे चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार अंबादास दानवेंनी केली आहे. ते म्हणालेत की, ‘मी थेट अब्दुल सत्तार यांचं नाव घेत नाही. पण, आमदार अब्दुल सत्तार हे मंत्री होते. त्यावेळी हा घोटाळा झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, अशी प्रतिक्रिया आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे. अब्दुल सत्तार यांच्या हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन मुलींची नावे आहेत. यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहेत.
Published on: Aug 08, 2022 10:36 AM
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
