AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका

लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका

| Updated on: Oct 04, 2026 | 11:57 AM
Share

भाजपच्या एका नेत्याने ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा देताना, हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारण्याचा सल्ला दिला. तर, उद्धव ठाकरेंच्या मागील कार्यकाळावर आणि त्यांच्या सध्याच्या राजकीय भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही राजकीय मोट केवळ स्वार्थासाठी जुळल्याचा आरोप करत, जनतेला मूर्ख समजू नका, असेही नेत्याने सुनावले.

एका भाजप नेत्याने महाराष्ट्र राजकारणातील ठाकरे बंधूंच्या सध्याच्या भूमिकेवर आणि त्यांच्या मोर्चावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. राज ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी मनापासून शुभेच्छा देताना, त्यांनी उद्धव ठाकरे किंवा सोनिया गांधींच्या नादी न लागता, हिंदुत्वाचा आणि वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. असे केल्यास राज ठाकरे निश्चितपणे मुख्यमंत्री होऊ शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरेंवर मात्र त्यांनी जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंना पंतप्रधान नव्हे, तर मंगळ, पृथ्वी यांसारख्या विविध ग्रहांवरील एखादे मोठे अध्यक्षपद निवडायला पाहिजे, अशी उपरोधिक टीका केली. त्यांच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात ते मातोश्रीत बसून केवळ फेसबुक लाईव्ह करत होते, हात धुण्याचा सल्ला देत होते, अशी आठवण करून दिली. महत्त्वाचं म्हणजे, नवनाथ बन यांनी ठाकरे बंधूंवर आरोप करत सवाल उपस्थित केला, की जीथं तुमचं (विरोधी पक्षाचं) सरकार येतं तिथे निवडणुक आयोग योग्य आणि जिथं भाजप तिथंच अयोग्य प्रकार असं का म्हणता? पुढे ते म्हणाले, लोकांचं मोर्नींग वॉक तुमच्या मोर्च्यापेक्षा लांब असतं.

कालपर्यंत एकमेकांवर चिखलफेक करणारे दोन्ही ठाकरे भाऊ आज केवळ राजकीय अस्तित्वासाठी आणि सत्तेच्या हव्यासापोटी एकत्र आले आहेत, असा गंभीर आरोपही नेत्याने केला. जनतेला मूर्ख समजणे आता बंद करा, असे सुनावत निवडणुकीतील पराभव स्पष्ट दिसू लागल्यानेच आतापासून ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर खापर फोडण्याची ही पूर्वतयारी असल्याचा दावाही त्यांनी केला.

Published on: Oct 04, 2026 11:54 AM

Follow Us