AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्नाटक निवडणुकीवरून सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना घेरलं, बाळासाहेबांचं नाव घेत साधला निशाणा

कर्नाटक निवडणुकीवरून सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना घेरलं, बाळासाहेबांचं नाव घेत साधला निशाणा

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: May 09, 2023 | 9:41 AM
Share

VIDEO | कर्नाटक निवडणुकीवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा राज ठाकरे यांच्यावर निशाणा, बघा काय केली टीका?

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election 2023) पार्श्वभूमीवर बेळगावातील मराठी जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी ममतदारांना केलं आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी सकाळी केलेलं ट्विट ट्विटरवरून डिलीट केल्याचं पाहायला मिळालं. सीमा भागातील मराठी उमेदवारांना निवडून द्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं. पण अवघ्या काही तासातच राज ठाकरे यांनी आपल्या भूमिकेवरून यु टर्न घेतल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.  अशातच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना घेरलंय.

कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकिकरण समितीने घेतलेली भूमिका आणि या निवडणुकीत उभे असलेले उमेदवार यांच्या पाठिशी शिवसेना उद्धव ठाकरे गट ठामपणे उभी आहे. मात्र यातून एक गोष्ट पुढे आली, महाराष्ट्रात आम्हीच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे वारसदार आहोत, आम्ही मराठी अस्मिता आणि बाणा जपणारे आहोत, असं सांगणारी माणसं जी महाराष्ट्रात भाजप उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांच्यासाठी प्रचारसभा घेऊन त्यांची तोतयागिरी करताय असे सुषमा अंधारे म्हणालया तर बाळासाहेबांचे वारसदार असल्याची बनावटगिरीचा तो मुखवटा निश्चितपणे गळून पडला आहे. परंतू काही नेत्यांनी महाराष्ट्र एकिकरण समितीच्या पाठिशी उभं राहण्याची भूमिका घेतली असेल तर निश्चितपणे त्याचं स्वागत केलं पाहिजे, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

Published on: May 09, 2023 09:41 AM
Follow Us