AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अजूनही ते सहा खासदार आलेच नाहीत; संसदीय दलाच्या बैठकीला सुरुवात, काही काळातच...

मोठी बातमी! अजूनही ते सहा खासदार आलेच नाहीत; संसदीय दलाच्या बैठकीला सुरुवात, काही काळातच…

| Updated on: Jun 18, 2026 | 11:57 AM
Share

ठाकरे गटात पुन्हा एकदा मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी पक्ष बैठकीकडे पाठ फिरवल्याने दिल्लीसह महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच खासदारांसाठी महत्त्वाची बैठक बोलावली होती.

ठाकरे गटात पुन्हा एकदा मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी पक्ष बैठकीकडे पाठ फिरवल्याने दिल्लीसह महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच खासदारांसाठी महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला संबंधित अनेक खासदार गैरहजर राहिल्याने पक्षात मोठी बंडखोरी होणार का अशी चर्चा सुरू झाली होती.

या खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे हे खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत का याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. आज दि.18 जून रोजी पुन्हा संसदीय दलाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबाबत अधिकृत व्हीपदेखील जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, खासदारांबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी बैठकी आधीच कठोर शब्दांत इशारा दिला. “जे आले ते आमच्या पक्षासोबत, बाकी गद्दार समजायचे,” असे वक्तव्य त्यांनी केले होते. ताज्या माहितीनुसार, गेल्या 20 मिनिटांपासून बैठक सुरू असून बंडखोरीची चर्चा असलेले सर्व 6 खासदार अनुपस्थित असल्याचं समजतंय. लवकरच या प्रकरणाचं चित्र स्पष्ट होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

Published on: Jun 18, 2026 11:45 AM

Follow Us