AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 Marathi Special Report । तामिळनाडूत सत्तास्थापनेचा सस्पेन्स; थलपती विजय यांच्या सरकार स्थापनेला ब्रेक, राज्यपाल असमाधानी?

Tv9 Marathi Special Report । तामिळनाडूत सत्तास्थापनेचा सस्पेन्स; थलपती विजय यांच्या सरकार स्थापनेला ब्रेक, राज्यपाल असमाधानी?

| Updated on: May 07, 2026 | 10:29 AM
Share

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत मोठा विजय मिळवला असला, तरी सरकार स्थापनेचा मार्ग अद्याप स्पष्ट झालेला नाही. बहुमताच्या आकड्यांमध्ये अडचण निर्माण झाल्यामुळे विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. तामिळनाडू विधानसभेत सत्ता स्थापनेसाठी 118 आमदारांचे समर्थन आवश्यक आहे.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत मोठा विजय मिळवला असला, तरी सरकार स्थापनेचा मार्ग अद्याप स्पष्ट झालेला नाही. बहुमताच्या आकड्यांमध्ये अडचण निर्माण झाल्यामुळे विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. तामिळनाडू विधानसभेत सत्ता स्थापनेसाठी 118 आमदारांचे समर्थन आवश्यक आहे. सध्या टीव्हीके पक्षाकडे 108 जागा आहेत. मात्र विजय थलपती हे दोन मतदारसंघांतून विजयी झाल्याने त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे टीव्हीकेची संख्या 107 वर येणार आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या पाच आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दर्शवला असून त्यामुळे पक्षाची एकूण ताकद 112 वर पोहोचली आहे. तरीही बहुमतासाठी अजून सहा आमदारांची आवश्यकता असल्याने सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. या पार्श्वभूमीवर टीव्हीकेने सरकार स्थापनेचा दावा करत राज्यपालांकडे बहुमताचे पत्र सादर केले आहे. मात्र उपलब्ध आकड्यांवर राज्यपाल समाधानी नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विजय यांच्या शपथविधीला विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यपालांनी टीव्हीकेसमोर दोन पर्याय ठेवले असल्याचे सांगितले जात आहे. एक म्हणजे विशेष अधिवेशन बोलावून सभागृहात बहुमत सिद्ध करणे, किंवा इतर पक्ष व अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवून त्यांची पत्रे सादर करणे. त्यामुळे आगामी काही दिवसांत तामिळनाडूच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

Published on: May 07, 2026 10:29 AM
Follow Us