एकच जल्लोष! मनसेतील बड्या नेत्यांचा लोकलने प्रवास, ट्रेनमधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
मुंबईतील वीर सावरकर मार्गावर आज होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त तिरंगा विजय जल्लोष सभेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या सभेसाठी मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शेकडो कार्यकर्ते ठाणे, कल्याण आणि डोंबिवली येथून लोकल ट्रेनने मुंबईकडे रवाना झाले.

ठाणे रेल्वे स्थानकावरून माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, मनसे नेते अविनाश जाधव आणि शहराध्यक्ष रवींद्र मोर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एकत्र प्रवास केला. कल्याण-डोंबिवली परिसरातूनही मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि मनसैनिक मुंबईकडे निघाले.
रेल्वे स्थानके आणि लोकल ट्रेनमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भगवे झेंडे फडकावत आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी उत्साह व्यक्त केला. “धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झांकी है, नरेंद्र मोदी बाकी है” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
काही वेळातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावरून कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. तरुणांना कोणता संदेश दिला जाणार, सत्ताधाऱ्यांवर कोणत्या मुद्द्यांवर टीका होणार आणि आगामी राजकीय दिशा काय असणार, याकडे राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Jul 26, 2026 11:14 AM
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...