Eknath Shinde : युतीला ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलं यश मिळालं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
एमएमआरडीएच्या माध्यमातून घरं बांधण्याचा निर्णय घेतला आहे. दरड कोसळून नुकसान होणाऱ्यांना हक्काची घरं दिली जातील. पुनर्वसन योग्य प्रकारे केलं जाईल, असंही शिंदे यांनी सांगितलं.
मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप-शिंदे गटाला चांगलं यश मिळालंय. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, युतीला खूप चांगले यश मिळालं आहे. विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो. भाजप-सेना युतीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. मतदारांनी भरभरून मतं दिली. त्या सर्वांचं अभिनंदन करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री म्हणाले, दरड कोसळून साडेपाचशे लोकांचं नुकसान झालं होतं. या साडेपाचशे लोकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा ऐरणीवर होता. जागेसाठी लागणारी रक्कम देण्याचा निर्णय घेतला. एमएमआरडीएच्या माध्यमातून घरं बांधण्याचा निर्णय घेतला आहे. दरड कोसळून नुकसान होणाऱ्यांना हक्काची घरं दिली जातील. पुनर्वसन योग्य प्रकारे केलं जाईल, असंही शिंदे यांनी सांगितलं.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

