Sonia Gandhi : मोठी बातमी! सोनिया गांधींना कोरोनाची लागण, अन्य काही नेत्यांनासुद्धा कोरोनाची लागण
सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्यां समोर आल्यानं संपर्कात आलेल्या इतरही काँग्रेस नेत्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची भीती व्यक्त केला जात आहे.
नवी दिल्ली : एक मोठी बातमी हाती आली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (sonia Gandhi) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून सोनिया गांधी यांच्या काँग्रेस (Congress) नेत्यांसोबत बैठका सुरु होत्या. त्यामुळे सतत सोनिया गांधी यांचं काम सुरू होतं. सातत्यानं सुरु असलेल्या बैठकांचं सत्र सोनिया गांधी यांचं काँग्रेस नेत्यांसोबत सुरु होतं. दरम्यान, यापूर्वी सोनिया गांधी यांना ईडीने नोटीस बजावली होती. सोनिया गांधी याच्या संपर्कात आलेल्यांना देखील सावध करण्यात आलंय. तर सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्यां समोर आल्यानं संपर्कात आलेल्या इतरही काँग्रेस नेत्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची भीती व्यक्त केला जात आहे. बुधवारी संध्याकाळी सोनिया गांधी यांना ताप आला असल्याची माहिती आहे.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

