Mumbaicha Raja Ganpati LIVE | मुंबईच्या राजाचं पहिलं मुखदर्शन TV9 वर लाईव्ह

उद्यापासुन गणेशोत्सवाला सुरवात होतेय. गणेशभक्तांचं आकर्षण असलेल्या गणेशगल्ली उत्सव मंडळाच्या मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज होत आहे. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच गणेशगल्लीचा उत्सव म्हणजे भव्य दिव्य देखावे यांसाठी प्रसिद्ध आहे.

उद्यापासुन गणेशोत्सवाला सुरवात होतेय. गणेशभक्तांचं आकर्षण असलेल्या गणेशगल्ली उत्सव मंडळाच्या मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज होत आहे. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच गणेशगल्लीचा उत्सव म्हणजे भव्य दिव्य देखावे यांसाठी प्रसिद्ध आहे. पण यंदाच्या गणेशोत्सवात राज्याच्या गृह विभागाने सार्वजनिक गणेशोत्सवातील गणपतींचे दर्शन फक्तं आँनलाईन करण्याचीच परवनगी दिलीय. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये मोठी नाराजी पसरलीय.  महाराष्ट्र शासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे, त्या नियमावलीनुसार यंदा गणेश उत्सव आम्ही साजरा करत आहोत जास्तीत जास्त भाविकांना ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था अशी महाराष्ट्र शासनाने दिली होती त्या अनुषंगाने ऑनलाइन ची व्यवस्था मी केलेली आहे. जेणे करून मंडळाचे ऑफिशिअल पेज आहे त्यावरुन भाविक दर्शन घेऊ शकतील त्याचबरोबर लोकल केबल नेटवर्किंग चॅनलवरून दर्शन घेऊ शकता अशा प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून घरबसल्या मुंबईच्या राजाचा दर्शन 24तास घेण्यासाठी मंडळाने प्रयत्न केलेला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI