AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीचा प्रस्ताव परत पाठवला, Sudhir Mungantiwar यांची प्रतिक्रिया

| Edited By: | Updated on: Mar 15, 2022 | 11:55 PM
Share

हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्यामुळे निवडणुकीची तारीख जाहीर करु शकत नसल्याचं राज्यपालांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election) घेण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) प्रयत्नशील आहे. मात्र, चालू अधिवेशनातही विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार नसल्याचं आता तरी पाहायला मिळतंय. कारण, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबतचा राज्य सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्यामुळे निवडणुकीची तारीख जाहीर करु शकत नसल्याचं राज्यपालांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us