सांगली: राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी पंचायत समितीच्या निवडणुकीतून आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा केला होता. आबांच्या निधनाच्या सात वर्षानंतर त्यांचा मुलगा रोहित पाटील यांनीही राजकारणात दमदार एन्ट्री केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी नगरपंचायतीत आपल्या पॅनेलच्या 10 जागा निवडून आणल्या आहेत. हा विजय जनतेचा असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी या विजयासाठी जनतेचे आभार देखील मानले आहेत. अजित पवारांसह राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी रोहित यांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.