बस पुलावरुन डायरेक्ट नदीत कोसळली! इंदोर-अमळनेर बस अपघाताचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन; पाहा घटनास्थळावरील LIVE व्हिडिओ
इंदोरवरून अमळनेरकडे येणाऱ्या बसला (MP Bus Accident) सकाळी दहा ते सव्वा दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. बस पुलावरुन डायरेक्ट नदीत कोसळली आहे.
जळगावः इंदोरवरून अमळनेरला येणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. बस पुलावरुन डायरेक्ट नदीत कोसळली आहे. घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. tv9 ची टीम घटनास्थळी पोहचली आहे. आतापर्यंत प्रशासनाने 13 लोकांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. महाराष्ट्र सरकार आणि मध्यप्रदेश सरकार या दोन्ही सरकार या ठिकाणी शोधमोहिम सुरू केली आहे. अद्यापही बसचा ड्रायव्ह आणि कंडक्टर यांचा शोध लागलेला नाही. इंदोरवरून अमळनेरकडे येणाऱ्या बसला (MP Bus Accident) सकाळी दहा ते सव्वा दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. जळगावचे आमदार गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी घेतलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून अद्याप कुणीही जिवंत सापडले नाही.
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र

