West Bengal Election | प. बंगालच्या आसनसोलमध्ये उसळली हिंसा, TMC कार्यालयात तोडफोड, नेमकं काय घडंल?
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. जवळपास तीन राज्यांमध्ये सत्तपालट होण्याचे चिन्ह आहे. यामध्ये विशेषतः पश्चिम बंगालमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. जवळपास तीन राज्यांमध्ये सत्तपालट होण्याचे चिन्ह आहे. यामध्ये विशेषतः पश्चिम बंगालमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतमोजणी अजून सुरु असतानाच प. बंगालमधील आसनसोलमध्ये मोठा राडा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमनसोल भागातील कार्यालयात तोडफोड झाली आहे. कार्यालयाजवळच्या गाड्यां, खूर्च्या यांच्यासह अनेक वस्तूंची तोडफोड झाली आहे.
यानंतर दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक झाली, ज्याचं रूपांतर हाणामारीत झालं. यामध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ता जखमी झाले आहेत. याआधीही बंगालमध्ये निवडणुकीच्या काळात दंगली किंवा राडे होताना दिसतात. त्यामुळेच निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यात केंद्रीय पोलीस बल तैनात करण्यात आलं होतं.
Published on: May 04, 2026 02:20 PM
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा

