Video : आताच्या घडीच्या महत्वाच्या बातम्या, पाहा एका क्लिकवर…

मे महिन्याच्या सुरुवातीला त्यांचा दौरा होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जातोय. आदित्य ठाकरे यांनीच त्याबाबत संकेत दिले आहेत. तर आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यात एक बैठकही पार पडली. त्यानंत बोलताना अयोध्या शिवसेनेसाठी नवीन नाही. ती आमची पायवाट आहे, असा टोला संजय राऊतांनी मनसेला लगावलाय. संजय राऊत म्हणाले […]

आयेशा सय्यद

|

Apr 19, 2022 | 5:58 PM

मे महिन्याच्या सुरुवातीला त्यांचा दौरा होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जातोय. आदित्य ठाकरे यांनीच त्याबाबत संकेत दिले आहेत. तर आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यात एक बैठकही पार पडली. त्यानंत बोलताना अयोध्या शिवसेनेसाठी नवीन नाही. ती आमची पायवाट आहे, असा टोला संजय राऊतांनी मनसेला लगावलाय. संजय राऊत म्हणाले की, अयोध्या शिवसेनेसाठी नवीन नाही. ती आमची पायवाट आहे. गेली 30 वर्षे शिवसेना आणि अयोध्या हे नातं आहे. त्यामुळे आम्हाला तयारी करण्याची गरज नाही. आम्ही अयोध्येत जात असतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसतानाही जाऊन आले आणि नंतरही. स्वत: आदित्य ठाकरेही जाऊन आले. मधल्या काळात कोरोनामुळे आम्हाला जाता आलं नाही. आमचा अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम आधीच ठरलाय. चार पाच दिवसांत तारीख ठरवू, असंही राऊतांनी जाहीर केलंय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें