Nagpur | कोरोना झालेल्या रुग्णांवर नाकाद्वारे होणार उपचार, नागपूरमध्ये चाचणी सुरु

आता कोरोनावर नाकाद्वारे उपचार करण्यासाठी एक विशेष पद्धत विकसित करण्यात येत आहे. या पद्धतीच्या मानवी चाचणीला नागपूरच्या शासकीय रुग्णालयात परवानगी मिळालीय.

कोरोना विषाणूचा सर्वाधिक फैलाव हा नाकाद्वारे होते. त्यामुळे आता कोरोनावर नाकाद्वारे उपचार करण्यासाठी एक विशेष पद्धत विकसित करण्यात येत आहे. या पद्धतीच्या मानवी चाचणीला नागपूरच्या शासकीय रुग्णालयात परवानगी मिळालीय. ही पद्धत कोरोनाचे इन्फेक्शन तसेच कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे

भारतच नव्हे तर संपूर्ण जगाला कोरोना या विषाणूने ग्रासले आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झालाय. कोरोनाला थोपवण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक वेगवेगळ्या उपचार पद्धती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच प्रकारे एका उपचार पद्धतीच्या चाचणीचे प्रयोग नागपुरातदेखील केले जात आहे. नागपुरात चाचणी करण्यात येत असलेली उपचार पद्धती ही स्प्रेच्या स्वरूपात आहे. या उपचार पद्धतीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल जगातील वेगवेगळ्या ठिकाणी सुरु आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI