दोन वाघ एकमेकांना भिडले, मस्ती की लढाई? पहा थरारक व्हिडिओ
अलिझनजा बफर झोन परिसरात सध्या बबली वाघीण आणि तिचे तीन बछडे, भानुसखिंडी वाघीण, तिचे दोन बछडे, छोटा मटका या वाघाचे अधिवास आहे. त्यापैकी बबली आणि तिचे तीन बछडे सध्या नऊ ते दहा महिन्याचे झाले आहेत.
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे वाघांचे हमखास दर्शन होते. नुसते दर्शनच नाही तर वाघ आणि त्यांच्या बछड्याच्या विविध रोमांचक अदाही कॅमेऱ्यात कैद होत आहेत. असाच एक थरार अलिझनजा बफर झोन परिसरात मुंबईचे पर्यटक फोटोग्राफर विवान करापूरकर यांच्यासह चालक प्रवीण बावणे यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला आहे. अलिझनजा बफर झोन परिसरात सध्या बबली वाघीण आणि तिचे तीन बछडे, भानुसखिंडी वाघीण, तिचे दोन बछडे, छोटा मटका या वाघाचे अधिवास आहे. त्यापैकी बबली आणि तिचे तीन बछडे सध्या नऊ ते दहा महिन्याचे झाले आहेत. बबलीने या बछड्याना अनेक प्रकारचे शिक्षण दिले त्याच शिक्षणाचे प्रात्यक्षिके बबलीचे बछडे करत आहेत. स्वतःला शिकार आणि आत्मरक्षा करण्यासाठी ते कसरत करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून बबलीच्या दोन बछड्यात सुरू असलेल्या मस्ती वजा लढाईचा क्षण फोटोग्राफर विवान करापुरकर यांनी टिपला आहे. हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर खूपच व्हायरल झाला आहे.
Published on: Jul 15, 2023 10:56 PM
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
