बँक साताऱ्याची तर निर्णयही साताऱ्यात व्हावेत, उदयनराजेंची संतप्त पोस्ट

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी एक संतप्त फेबसुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांच्या निशाण्यावर  दोन राष्ट्रवादीचे नेते तर एक भाजप नेते आहेत आणि पोस्ट आहे.

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी एक संतप्त फेबसुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांच्या निशाण्यावर  दोन राष्ट्रवादीचे नेते तर एक भाजप नेते आहेत आणि पोस्ट आहे. सातारा जिल्हा बँकेबाबतची..! सातारा जिल्ह्याचे निर्णय जिल्ह्यातच झाले पाहिजे, असा आग्रह धरत साताऱ्याची बँक आणि निर्णय पुण्यात, असं होऊ देणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे. सहकारी संस्था कुणी मोडकळीस आणल्या?, संस्थांचं खाजगीकरण कुणी केलं?, कुणामध्ये अहंकार आहे, कुणामध्ये मी पणा आहे?, असे एक ना अनेक सवाल फेसबुक पोस्टच्या माध्यमातून विचारत उदयनराजेंनी कोणत्याही नेत्याचं नाव घेतलेलं नाही. पण यात प्रामुख्याने शरद पवार-अजित पवार-रामराजे निंबाळकर-शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर उदयनराजेंकडे अप्रत्यक्ष रोख असल्याची चर्चा आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI