UdayanRaje Bhosale : ‘कोण वाघ्या कुत्रा?’, रायगडावरील ‘त्या’ समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भोसले भडकले
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा 336 वा पुण्यतिथी दिन आज साजरा केला जात आहे. पुणे जिल्ह्याच्या श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी आज संपन्न होत आहेत.
‘कोण वाघ्या कुत्रा? एकच वाघ होऊन गेला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज’, असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी वाघ्या कुत्र्याच्या सुरू असलेल्या महाराष्ट्रातील वादावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तर ‘मला समजत नाही लोकांना काय झाले आहे. देव तर कोणी पाहायला नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने त्या काळातील लोकांना देव निश्चितपणे पाहायला मिळाला. आज या लोकशाहीत छत्रपती शिवाजी महाराज हे मूळ पुरूष आहेत त्यांना आपण युगपुरूष म्हणतो. दुर्दैव ऐवढंच आहे की या मूळ पुरूषांची वारंवार थट्टा, अवमान केला जात आहे. त्यामुळे समाज इतका विकृत झाला आहे का?’, असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त करत सवाल केलाय. पुढे उदयनराजे भोसले असेही म्हणाले, महापुरूषांचा अवमान करणाऱ्यांबाबत एखादा कायदा असायला हवा. मकोका सारखा कायदा आहे. त्याप्रमाणे किमान 10 वर्ष शिक्षा लागू झाली पाहिजे, असा कायदा अद्याप लागू करण्यात आला नाही. जर सरकार छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असते तर या अधिवेशनात का कायदा पारित केला नाही, असं म्हणत त्यांनी खेद व्यक्त केला.
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

