उदयनराजे भोसले यांचा साताऱ्यात 350 बाईक रॅलीमध्ये सहभाग, तुफान चालवली बुलेट
VIDEO | शिवप्रेमींनी आयोजित केलेल्या 350 दुचाकी रॅली मध्ये बुलेट चालवत उदयनराजे भोसले यांचा सहभाग
सातारा : शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. पोवई नाका येथील शिवतीर्थावर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त त्यांच्या पोवई नाक्यावरील पुतळ्याला अभिवादन करून शिवप्रेमींनी आयोजित केलेल्या 350 दुचाकी रॅलीमध्ये बुलेट चालवत ते सहभागी झाले. यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्वतःहा बुलेट चालवली. पोवई नाका येथून सुरू झालेली रॅली राजवाडा मार्गे पुन्हा शिवतीर्थावर संपन्न झाली. या रॅली मध्ये शेकडोच्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले.यावेळी छत्रपती उदयनराजे यांनी आपली प्रतिक्रिया देत 350 वर्षे पूर्ण होऊन आजही शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने मोठा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित

