Uddhav, Raj Thackeray Victory Rally LIVE: कुणाची माय व्यालीय त्यांनी.. ; मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आक्रमक
Uddhav, Raj Thackeray Victory Rally LIVE Updates in Marathi: वरळी डोम येथील विजय मेळाव्यातून राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिला आहे.
महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कुणाची माय व्यालीय त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवा. मुंबईला हात घालून दाखवा. मजाक वाटला का. आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत, असा थेट इशारा राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, या हिंद प्रांतात सव्वाशे वर्ष आम्ही राज्य केलं. आम्ही मराठी लादली. गुजरात, पंजाब, मध्यप्रदेश अटोकपर्यंत आम्ही पोहोचलो. आम्ही लादली? हिंदी भाषा २०० वर्षापूर्वीची भाषा आहे. महाराजांच्या काळातही नव्हती. कशासाठी आणि कोणासाठी? यांनी फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वतंत्र करता येते का यासाठी भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कुणाची माय व्यालीय त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवा. मुंबईला हात घालून दाखवा. मजाक वाटला का. आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत, अशी थेट टीका ठाकरेंनी यावेळी केली.

रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला

मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने

प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल

पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला
