मिंध्याच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार का?, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर घणाघात
VIDEO | तुमचे ५२ काय १५२ कुळं खाली उतरले तरी..., उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला
नाशिक : उद्धव ठाकरे यांची आज मालेगावात सभा पार पडली यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार निशाणा साधला अजूनही माझ्या वडिलांचे नाव वापरावं लागतं हा तुमचा पराभव आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलं सुनावलं यावेळी त्यांनी भाजपवर टीका करताना भाजपने जाहीर करावा की येणाऱ्या निवडणुका मीन त्यांच्या नेतृत्वाखाली लढतील तर मी मानेल, असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले भाजपचे दोन प्रदेशाध्यक्ष आहेत एक म्हणजे चंद्रकांत पाटील आणि दुसरं म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे. जेव्हा सत्तांतर झाले तेव्हा ते म्हणाले होते की हृदयावर दगड ठेवून उरावर घेतलं आहे म्हणजे हे मिंधे आहे त्यांच्यासाठी… तर आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की आम्ही मिंधे गटाला फक्त 48 जागा देणार आणि तुमच्या नावाप्रमाणे 52 जागा तरी द्या त्यांना असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला खोचक टोला लगावला आहे.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप

