AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! 7 खासदार फुटणार? चर्चांना उधाण; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, ते खासदार....

मोठी बातमी! 7 खासदार फुटणार? चर्चांना उधाण; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, ते खासदार….

| Updated on: Jun 16, 2026 | 10:07 AM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा रंगली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार फुटण्याच्या शक्यतेमुळे पक्षात खळबळ उडाली आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांदरम्यान ठाकरे गटातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा रंगली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार फुटण्याच्या शक्यतेमुळे पक्षात खळबळ उडाली आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांदरम्यान ठाकरे गटातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच मातोश्रीवर पक्षाच्या खासदारांची बैठक घेतली होती. या बैठकीला काही खासदार प्रत्यक्ष उपस्थित नव्हते, मात्र त्यांनी ऑनलाइन माध्यमातून सहभाग घेतल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले होते.

दरम्यान, दिल्लीत घडलेल्या काही राजकीय हालचालींमुळे ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. जर ही शक्यता प्रत्यक्षात आली, तर तो उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जाऊ शकतो.

या सर्व घडामोडींनंतर ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्यासाठी बैठका घेतल्या जात असून, ईशान्य मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी खासदार फुटीच्या चर्चांवर भाष्य केले.

यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. “खासदार पक्षासोबतच आहेत. संजय दिना पाटील यांच्यासह सर्व खासदार आपल्या संपर्कात आहेत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी खासदारांनीही स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधावा, अशा सूचना देण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, ठाकरे गटातील सात खासदार फुटण्याच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, पुढील काही दिवसांत या घडामोडींना कोणते वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 16, 2026 10:07 AM

Follow Us