ही वादळापूर्वीची शांतता, नंतर… उद्धव ठाकरेंनी एका वाक्यातच दिली कोर्टातील सुनावणीबाबत मोठी प्रतिक्रिया
शिवसेना उबाठा गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पत्राकर परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, "गेल्या चार वर्षांपासून मुळ शिवसेना नक्की कोणाची, याबाबत न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाची सुनावणी आता सुरू झाली आहे. या प्रकरणावर
शिवसेना उबाठा गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पत्राकर परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, “गेल्या चार वर्षांपासून मुळ शिवसेना नक्की कोणाची, याबाबत न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाची सुनावणी आता सुरू झाली आहे. या प्रकरणावर न्यायालयात असल्याने आपण आतापर्यंत बोललो नाही आणि पुढेही बोलणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. संविधानाप्रमाणे निकाल लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
देशातील सध्याच्या राजकीय वातावरणावर बोलताना ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. पावसाळ्यातील मतलई वाऱ्याचा संदर्भ देत ते म्हणाले, “आता देशात मतलबी वारे सुरू आहे.” विरोधातून सत्ताधाऱ्यांकडे लोक जात आहेत, मात्र त्यामुळे विरोधक थंड होणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
“देशात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. ही वादळापूर्वीची शांतता आहे,” असे म्हणत त्यांनी फुटीर खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यावरही भाष्य केले.
दरम्यान, जगभरात जेन-जीने सरकारला गुडघ्यावर आणल्याची चर्चा असल्याचे ठाकरे म्हणाले. तरुणांना आधार देण्याऐवजी त्यांच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप करत त्यांनी जालियनवाला बागेच्या हत्याकांडाचाही उल्लेख केला.
Published on: Aug 08, 2026 01:21 PM
ही वादळापूर्वीची शांतता, नंतर... उद्धव ठाकरे एका वाक्यातच म्हणाले
आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स... PM मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
उमेश पाटलांच्या एका पोस्टने वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन
शरद पवार गटाची मोठी खेळी? सुळे यांच्या नेतृत्वात सर्व खासदार...

