Moscow Russia | ड्रोनच्या हल्ल्यानं रशियातील मॉस्को हादरला, दहशतवादी हल्ला असल्याचा दावा
VIDEO | रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये पुन्हा एकदा ड्रोनचा हल्ला, ड्रोनव्दारे मॉस्कोतील इमारतीवर निशाणा
मॉस्को, 30 जुलै 2023 | रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये पुन्हा एकदा ड्रोनचा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला युक्रेनने केल्याचा आरोप रशियाने केला असून हा दहशतवादी हल्ला असल्याचा दावाही करण्यात येत आहे. हा हल्ला इतका भयानक होता की, रशियाच्या या एअर डिफेन्स सिस्टिमलाही हा हल्ला टाळता आला नाही. या हल्ल्यात दोन इमारतींचं मोठं नुकसान झालं आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मॉस्कोच्या महापौरांनीही हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण रशिया हादरून गेला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रशियाने नुकावो एअरपोर्ट बंद केला आहे. मॉस्कोच्या आयक्यू क्वार्टर नावाच्या गगनचुंबी इमारतीवर हा हल्ला झाला आहे. ही इमारत रहिवाशी असून काही सरकारी कार्यालयेही या इमारतीत असल्याची माहिती मिळतेय.

