video : संजय राऊत यांची विकृती सर्वांना दिसतेय : नारायण राणे
शिवसेना वाढविण्यासाठी नारायण राणे शिवसेनेत होता. मी शिवसेना संपविण्याची सुपारी नाही घेतली. ती संजय राऊतने घेतली आहे.
मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातला वाद हा वाढतच आहे. आज नारायण राणे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रीया देताना तुम्हाला फक्त राऊतांची विकृती समोर आणता आणि हे बरोबर नाही असं म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे भाजप आमदार राम कदम यांच्याकडून काशी यात्रेकरुंसाठी मोफत सोडण्यात येणाऱ्या ट्रेनला हिरवा कंदील देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं.
काल राऊत यांनी राणें यांना संरक्षण सोडून एकटं फिरूण दाखवा असे आव्हाण दिलं होतं. त्यावर आज पत्रकारांनी विचारले असता त्यांनी, संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोपही राणेंनी केला. त्यामुळे राणे-राऊत हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.
पत्रकारंची इच्छा असेल तर उत्तर द्यायाल मी एकटा जाईन, मला काही फरक पडत नाही असेही त्यांनी म्हटलं. तर शिवसेना वाढविण्यासाठी नारायण राणे शिवसेनेत होता. मी शिवसेना संपविण्याची सुपारी नाही घेतली. ती संजय राऊतने घेतली आहे.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

