Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. त्यामुळे शेतीचं नुकसान झालं आहे.
राज्यात आज अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने शेतीचं देखील नुकसान झालं आहे. राज्यात काही भागात पुढचे 5 दिवस हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. आज देखील अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. आज दिवसभर ढगाळ वातावरण बनून होते. त्यानंतर दुपारी काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर, कराड, जालना, संभाजीनगर, सातारा, या ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तर अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळीमुळे आंब्याच्या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
Published on: Apr 01, 2025 11:59 PM
Latest Videos
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा

