मुंबईत अवकाळी पावसाची रिमझिम, सकाळपासून ढगाळ वातावरण, कुठं बरसल्या सरी?
VIDEO | मुंबईतील चाकरमान्यांची सकाळी कामावर जाण्याची घाई असताना अवकाळी पावसाने नागरिकांची उडाली चांगलीच तारांबळ
मुंबई : मुंबई उपनगरातील अनेक भागात आज सकाळी अवकाळी पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई आणि आसपासच्या भागात देखील सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. मुंबई उपनगरातील अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी परिसरात आज सकाळी साडे सहा वाजेनंतर काहीसा जोरदार अवकाळी पाऊस झाला. मुंबई उपनगरातील अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी परिसरात सुमारे 15 मिनिटे मुसळधार पाऊस झाला, त्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले. मुंबईतील चाकरमान्यांची सकाळी कामावर जाण्याची घाई असताना अवकाळी पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दोन दिवसांपूर्वी मुंबईकरांसाठी अवकाळी पावसाची हवामान खात्याकडून शक्यता वर्तवण्यात आली होती. मुंबई आणि आसपासच्या परिसरात दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्यानं सांगितले होते . हवामान खात्याने मुंबईसह मुंबईतील काही परिसरात अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. दरम्यान, मुंबई आणि आसपासच्या परिसरात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती त्याप्रमाणे मुंबईत काही भागात अवकाळी पावसाची रिमझिम पाहायला मिळाली.
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
