UTS App Closed : मुंबईकरांनो महत्त्वाची बातमी, यूटीएस ॲप बंद! लोकल तिकीट अन् पासची सुविधा कायमस्वरूपी बंद, पर्याय काय?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! उपनगरीय मासिक पास काढण्यासाठी यूटीएस मोबाईल ॲपची सुविधा आता कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे. यापुढे नवीन पाससाठी रेल वन ॲपचा वापर करणे अनिवार्य आहे. सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने रेल वन ॲप सुरू करण्यात आले आहे. तसेच, अनारक्षित तिकिटांवर ३% सवलतही मिळेल.
मुंबईकरांसाठी रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला आहे. उपनगरीय रेल्वे गाड्यांचे मासिक पास काढण्यासाठी यूटीएस मोबाईल ॲपवर उपलब्ध असलेली सुविधा आता कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे. यामुळे मुंबईतील प्रवाशांना यापुढे नवीन मासिक पास काढण्यासाठी रेल वन ॲपचा वापर करणे बंधनकारक असेल. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, यूटीएस ॲपद्वारे यापूर्वी काढलेले मासिक पास त्यांच्या निश्चित कालावधीत संपुष्टात येईपर्यंत वैध राहतील. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सर्व रेल्वे सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रेल वन ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय, डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल वन ॲपवरून अनारक्षित तिकिटांची खरेदी केल्यास तीन टक्के सवलत जाहीर केली आहे. ही सवलत १४ जानेवारी ते १४ जुलै २०२४ या कालावधीसाठी लागू असेल. त्यामुळे मुंबईकरांना आता प्रवासाचे नियोजन करताना रेल वन ॲपचा वापर करणे अनिवार्य ठरणार आहे.
UTS ॲप बंद! लोकल तिकीट अन पासची सुविधा कायमस्वरूपी बंद, पर्याय काय?
हे काय भयानकच प्रकरण! चक्क उमेदवारी अर्जच गिळला... पुण्यात चाललंय काय?
पुण्यात गुन्हेगारांना तिकीट अन् अजित पवार यांची सारवासारव
नाशिकनंतर पुण्यात दादांची NCP अन् शिंदे सेना भाजपविरोधात एकत्र येणार?

