Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 5 PM | 22 August 2021
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेना नेते वैभव नाईक यांनी टीका केली आहे. सोमय्या यांनी केवळ नार्वेकरांच्या बंगल्यांचीच पाहणी करू नये. तर केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यांचीही पाहणी करावी, असं आव्हानच त्यांनी केलं आहे.
शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या दापोलीतील निर्माणाधीन बंगल्यावर हातोडा पडला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या उद्या या कारवाईची पाहणी करण्यासाठी दापोलीला जाणार आहे. त्यावरून शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमय्यांवर टीका केली आहे. सोमय्या यांनी केवळ नार्वेकरांच्या बंगल्यांचीच पाहणी करू नये. तर केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यांचीही पाहणी करावी, असं आव्हानच वैभव नाईक यांनी सोमय्यांना दिलं आहे.
वैभव नाईक यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आव्हान दिलं आहे. मिलिंद नार्वेकर यांनी बांधलेल्या बंगल्याचे पडलेले बांधकाम पाहायला येण्याआधी नारायण राणे यांचा जुहूमधील ‘अधीश’ बंगला आणि सिंधुदुर्गात केलेल्या अनधिकृत बांधकामाचीही पाहाणी करावी, असं आव्हानच नाईक यांनी दिलं आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

