Vaishnavi Hagawane Case : मोठी बातमी… राजेंद्र हगवणे यांची अजितदादांच्या राष्ट्रवादीतून हकालपट्टी, सुनेच्या मृत्यूला ठरले कारणीभूत
फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा सुशील हगवणे हे कुठे लपून बसले त्याच बरोबर हुंड्यात घेतलेले 51 तोळे सोने गहाण ठेऊन त्या पैशाचे काय केलं? या बाबत अटक असलेले सासू लता हगवने, नणंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे या तीनही आरोपींच्या पोलिस कोठडीत 26 मे पर्यंत वाढ करण्यात आली असून, बावधन पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत
राजेंद्र हागवणे यांची अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राजेंद्र हागवणे यांना सगळ्या पदावरून काढून टाकण्यात आल्याची मोठी माहिती समोर येत आहे. यासंदर्भात ,राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना जी घटना त्यांच्या घरात घडली ती मानवतेला काळीमा फासणारी आहे, असे म्हटलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या प्रवृत्तीचा निषेध करते आणि वैष्णवी हगवणे या बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आता करण्यात येत आहे.
वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा आरोप असणारे राजेंद्र हगवने आणि त्यांचा मुलगा सुशील यांच्यावर करण्यात आलाय. हे दोघेही अजूनही फरार असून दोन्ही आरोपींना शोधण्यासाठी बावधन पोलिसांची दोन पथके परराज्यात गेल्याची माहिती मिळतेय. तर मयत वैष्णवी यांचं 10 महिन्याचे चिमुकले बाळ ज्या निलेश चव्हाण नामक व्यक्तीकडे होतं त्यांनी ते बाळ हगवणे कुटुंबीयांकडे सुपूर्द केल्याची माहिती मिळतेय. दरम्यान बाळ आमच्या मुलीचे आहे आणि मागील सात दिवसांपासून त्याचे आईविना प्रचंड हाल होत असल्याने ते घेण्यासाठी आम्ही आज हगवणे कुटुंबीयांकडे जाणार असल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले होते.