Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
सीआयडीची ९ पथकं वाल्मिक कराडच्या मागावर होती. पण याआधी वाल्मिक कराडने स्वतःचा एक व्हिडीओ तयार केला. ज्यात त्याने आरोप फेटाळत खंडणीचा खोटा गुन्हा दाखल झाल्याचे कराडने म्हटलंय. दुपारी बारा वाजता वाल्मिक कराडने व्हिडीओ सार्वजनिक केला. त्यानंतर अवघ्या ५ मिनिटातच त्याने पोलिसांना सरेंडर केलं
बीड सरपंच हत्या प्रकरणावरून ज्या आकाला अटक करण्याची मागणी होत होती. त्या वाल्मिक कराडने स्वतःहून पुण्याच्या सीआयडी ऑफिसमध्ये सरेंडर केलं आहे. यापूर्वी त्याने एक व्हिडीओ देखील सार्वजनिक केला आहे. ज्यामध्ये राजकीय द्वेषातून आरोप होत असल्याचे वाल्मिक कराडने म्हटलं आहे. तब्बल २२ दिवसांनंतर वाल्किम कराड स्वतः सरेंडर झाला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात याच वाल्मिक कराडवर आरोप होत आहेत. यादरम्यान, सीआयडीची ९ पथकं वाल्मिक कराडच्या मागावर होती. पण याआधी वाल्मिक कराडने स्वतःचा एक व्हिडीओ तयार केला. ज्यात त्याने आरोप फेटाळत खंडणीचा खोटा गुन्हा दाखल झाल्याचे कराडने म्हटलंय. दुपारी बारा वाजता वाल्मिक कराडने व्हिडीओ सार्वजनिक केला. त्यानंतर अवघ्या ५ मिनिटातच त्याने पोलिसांना सरेंडर केलं. सीआयडीने वाल्मिक कराडला अटक केली. गतिशील तपसांमुळेच वाल्मिक कराड पोलिसांपुढे सरेंडर झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सीआयडीसमोर आल्यावर वाल्मिक कराडच्या अटकेचे सोपस्कार पूर्ण झालेत, त्यानंतर त्याची मेडिकल टेस्ट केली आणि त्याला केज येथे घेऊन आलेत. त्यापूर्वी सीआयडीने वाल्मिक कराडला काही सवाल केलेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
![भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/mamata-1.jpg?w=280&ar=16:9)
भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी
![मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Maharashtra-Police.jpg?w=280&ar=16:9)
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या
![धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/DHAS-.jpg?w=280&ar=16:9)
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी
!['लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार 'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/rate.jpg?w=280&ar=16:9)
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार
!['ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप 'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/mahadev-gitte.jpg?w=280&ar=16:9)