Raj Thackeray PC | प्रभाग रचनेवरुन राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात, लोकांनी कोर्टात जाण्याचं आवाहन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिकेच्या प्रभाग रचनेवरुन तीव्र संताप व्यक्त केलाय. राज्य सरकार लोकांना गृहित धरत आहे. माझी विनंती आहे की आता लोकांनीच कोर्टात जावं, असं आवाहनच राज ठाकरे यांनी केलंय.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारनं प्रभाग रचनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असणार आहे. महापालिकेच्या या प्रभाग रचनेवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.

राज्य सरकार लोकांना गृहित धरत आहे. माझी विनंती आहे की आता लोकांनीच कोर्टात जावं, असं आवाहनच राज ठाकरे यांनी केलंय. ते आज नाशिकमध्ये बोलत होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI