Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणुका जाहीर, कोणाच्या गळ्यात पडणार माळ?
Vidhan Parishan Election Declared: विधान परिषदेच्या 5 जागांसाठी येत्या 27 मार्चला निवडणुका होणार आहेत. यात इच्छुक उमेदवारांची नावं समोर आलेली आहेत. अगदी अटीतटीची ही लढत रंगणार आहे.
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. 27 मार्चला या निवडणुका होणार आहेत. महायुतीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला प्रत्येकी 1 जागा येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी, शीतल म्हात्रे यांच्या नावाचही चर्चा सुरू आहे. शिवसेनेतून रवींद्र पाठकसुद्धा इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी आणि आनंद परांजपे यांचं नाव पुढे येत आहे. दरम्यान, भाजपच्या गोट्यात 3 जागा आहेत. अगदी अटीतटीचा हा सामना असणार आहे. त्यामुळे विधान परिषदेची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे.

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
