Shivsena UBT News : विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटाचा दावा? कोणाची लागणार वर्णी, पाहा Video
Udhav Thackeray Will Claim On Opposition Leader Post : उद्धव ठाकरे यांची शिवसेना अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज यासंदर्भातली बैठक मातोश्रीवर पार पडली आहे.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गट हा दावा सांगणार आहे. तर विरोधी नेता म्हणून कोणाला निवडावं याचा निर्णय ठाकरेंनी आमदारांवर सोपवला आहे. ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये सध्या याबाबत चर्चा सुरू आहे. यात पक्षाचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव हे प्रबळ दावेदार मानले जात असून त्यांच्यानंतर प्रतो सुनील प्रभू आणि आदित्य ठाकरे यांचं देखील नाव चर्चेत आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. यात आगामी काळात मविआ आणि उबाठाची काय भूमिका असेल तसंच सत्ताधारी पक्षाला कात्रीत पकडण्यासाठी काय रणनीती आखली जाईल याबद्दल यात चर्चा होत आहे. मात्र मुख्य चर्चा ही विरोधी पक्षनेता निवडीबद्दल होणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेधनात शिवसेना उबाठा गट विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार आहे. हे पद कोणाला द्यायच याचा निर्णय मात्र ठाकरेंनी आमदारांवर सोपवला आहे.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?

