AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापुरात मोठा राडा! गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ, कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

कोल्हापुरात मोठा राडा झालाय. गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या दोन गटात राडा झाला. हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं.

कोल्हापुरात मोठा राडा! गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ, कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 08, 2026 | 12:10 PM
Share

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीचा तिढा अद्याप मिटलेला नाही. काँग्रेसचे सतेज पाटील हे अध्यक्ष निवडीसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. परंतु सरकारने 4 संचालकांची नियुक्ती केल्याने तिढा आणखी वाढलाय. सरकारकडून करण्यात आलेली संचालक नियुक्ती योग्य नसल्याचे सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. या अध्यक्ष निवडीचा वाद कोर्टातही पोहोचल आहे. राज्यातील नामांकित गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून थेट कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची झाल्याची घटना घडली आहे. करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. त्यानंतर या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

कोल्हापूरच्या दूध महासंघाचा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. एका माजी संचालकाने शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. कोल्हापूरच्या हिरवडे दुमालामध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत चर्चेतून वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. या प्रकरणी करवीर पोलीस ठाणे येथे दहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  3 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायतीमध्ये वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी शरद गणपती पाटील यांना बोलावण्यात आलं होतं. मात्र, वाद आणखी वाढला. आता हा वाद मिटवण्याच्या प्रयत्नादरम्यान 10 ते 12 जणांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.  ग्रामपंचायतीच्या बाहेर देखील त्यांना मारहाण करण्यात आली. घरी गेल्यानंतर पुन्हा बाहेर निघाले. त्यावेळी देखील त्यांना मारहाण झाली, असे तक्रारीत नमूद केलंय शरद गणपती पाटील यांनी यासंदर्भात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलाय.  शरद पाटील यांनी बाजीराव हरी पाटील,सदाशिव दिनकर यादव, शिवाजी दिनकर यादव, संभाजी शामराव यादव, समीर संभाजी यादव,सुधीर संभाजी व्यादव,ऋषीकेश शिवाजी यादव, श्रीवर्धन, सदाशिव यादव, निवास श्रीपती यादव,  समीर ‘शिवाजी यादव सर्व रा. रा. हिरवडे दुमाला या दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शरद पाटील हे शेतातून 3 नोव्हेंबर रोजी घरी जात होते. त्यावेळी गावातील शाळेजवळ बाजीराव पाटील यानी थांबवून मला काल झालेला वाद ग्रामपंचायतमध्ये या आपण मिटवून घेऊया, असे सांगितलं. त्यावर वादाबाबत चर्चा करत असताना मी सर्वांना हात जोडून माझी चुकी झाली, असे म्हणत असताना 10 जणांनी शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली असल्याचं तक्रारदार शरद पाटील यांनी म्हटले आहे.

Follow Us
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत,
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील नेत्याच...
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
भव्य रांगोळी, झगमग रोषणाई... दिवाळी पहाटचा उत्साह; पहा सुंदर व्हिडीओ..
Diwali 2026 : भव्य रांगोळी, झगमग रोषणाई... दिवाळी पहाटचा उत्साह; पहा सुंदर व्हिडीओ...
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी