AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonia Gandhi: बाबरी पडल्यानंतर रडल्या सोनिया गांधी; काँग्रेसच्या हृदयात आजही बाबर जिवंत, भाजपचा पलटवार

Congress BJP Controversy over Babri Masjid: बाबरीच भूत देशाच्या मानगुटीवर पुन्हा बसले. ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या एका वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये ठिणगी पडली. सत्ताधारी गोटातून विरोधी पक्षावर मोठा दारूगोळा डागण्यात आला.

Sonia Gandhi: बाबरी पडल्यानंतर रडल्या सोनिया गांधी; काँग्रेसच्या हृदयात आजही बाबर जिवंत, भाजपचा पलटवार
बाबरी पडल्यानंतर रडल्या सोनिया गांधी; काँग्रेसच्या हृदयात आजही बाबर जिवंत, भाजपचा पलटवार
| Updated on: Nov 08, 2026 | 11:54 AM
Share

Sudhanshu Trivedi on Congress: अयोध्येतील बाबरी मशीद प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी एक वक्तव्य केले. त्यावर आता भाजपच्या गोटातून तिखट प्रतिक्रिया उमटली. सोनिया गांधी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 1992 साली अयोध्येत बाबरी मशीद पडताना टीव्हीवर पाहिले, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपने आता पलटवार केला आहे. यावरून स्पष्ट होते की, काँग्रेसच्या हृदयात आजही बाबर जिवंत आहे, असा टोला भाजपचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी लगावला.

गांधींच्या पुस्तकात 1992 मधील घटनेचा उल्लेख

सोनिया गांधी यांनी त्यांचे आगामी पुस्तक Belonging: A Journey of Love च्या प्रकाशनापूर्वी ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियनला एक मुलाखत दिली. त्यात बाबरी मशीद पडण्याचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, 1992 मध्ये जेव्हा त्यांनी टीव्हीवर अयोध्येतील मशीद पडताना पाहिले, तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले. सोनिया गांधी यांच्या मते, तेव्हा त्यांना ही जाणीव झाली होती की, आता देशात धर्मनिरपेक्षतेसाठी दीर्घ लढा द्यावा लागेल. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या सहकारी यांनी देशात धर्मनिरपेक्ष भारतासाठी मोठा प्रयत्न केला. आता धर्मनिरपेक्षता टिकवण्यासाठी मोठा लढा द्यावा लागेल, याची जाणीव झाल्याचे सोनिया गांधी यांनी सांगितले.

काँग्रेसच्या चुकांचा भाजपला फायदा

या मुलाखतीत सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या राजकीय चुकांवर थेट भाष्य केले. त्यांनी मान्य केले की, पक्षाच्या काही चुकांमुळे भाजप आणि उजव्या विचारसरणीला, विशेषतः नव हिंदुत्वाला राजकीय आधार मिळाला. अनेक मुद्यांवर काँग्रेसला निश्चिंतपणा, बेफिकरी भोवली, असे मत त्यांनी मांडले. पक्षांतर्गतही अशीच बेशिस्त होती, त्याचा फटका पक्षाला बसला. सोनिया गांधी यांचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

सुधांशू त्रिवेदी यांचा जोरदार पलटवार

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी सोनिया गांधी यांच्या बेधडक वक्तव्यावर जोरदार पलटवार केला. बाबरी पडण्याचे दुःख कुणाला होते आणि कोणाच्या डोल्यात अश्रू आले होते, असा तिखट सवाल त्यांनी केला. काँग्रेसचा खरा चेहरा पुन्हा एकाद सर्वांसमोर आला आहे. जेव्हा अयोध्येत बाबरी पडली तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू हे तुष्टीकरणाच्या राजकारणाची साक्ष देतात अशी टीका त्रिवेदी यांनी केली. काँग्रेस नेहमीच एका विशिष्ट समुदायाला खूष करण्यासाठी आणि व्होटबँकेचे राजकारण करण्यासाठी या गोष्टींना महत्त्व देत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Follow Us
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत,
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील नेत्याच...
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
भव्य रांगोळी, झगमग रोषणाई... दिवाळी पहाटचा उत्साह; पहा सुंदर व्हिडीओ..
Diwali 2026 : भव्य रांगोळी, झगमग रोषणाई... दिवाळी पहाटचा उत्साह; पहा सुंदर व्हिडीओ...
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी