कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर, सणांमध्ये काळजी घेण्याची गरज असल्यानं ऑनलाईन दर्शनाचा निर्णय : विजय वडेट्टीवार

गणेशोत्सवात गर्दीमुळे ससंर्ग वाढण्याची भीती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. कोरोना रोखण्यासाठी ऑनलाईन दर्शनाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

गणेशोत्सवात गर्दीमुळे ससंर्ग वाढण्याची भीती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. कोरोना रोखण्यासाठी ऑनलाईन दर्शनाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तिसरी लाट उंबरठ्यावर आहे ती कधीही प्रवेश करु शकते. रुग्णसंख्या आता नियंत्रणात आहे, आम्ही घेतलेले निर्णय आणि प्रशासनाच्यावतीनं घेण्यात आलेले निर्णय यामुळं काळजी घेण्याची गरज आहे. गेल्यावर्षी काळजी न घेतल्यानं अनेकांनी जीव गेला. यावेळी काळजी घेतली आणि तिसरी लाट आली तरी नागरिकांचे जीव वाचवण्यात आपण यशस्वी होऊ. गणपती दर्शन ऑनलाईन घेतलं पाहिजे. सार्वजनिक उत्सवात गर्दी होऊ नये आणि संसर्ग होऊ नये ही त्यामागची भूमिका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांचे जीव वाचले पाहिजेत, याला प्राधान्य दिल्याचही विजय वडेट्टीवार म्हणाले.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI