Video : विलेपार्लेत 7 घरं नाल्यात कोसळताना कॅमेऱ्यात कैद! पाहा थरारक व्हिडीओ

सिद्धेश सावंत

|

Updated on: Sep 26, 2022 | 7:21 AM

विलेपार्लेत सात घरं कोसळण्याला कोण जबाबदार? मेट्रोचं काम की अजून कुणी? घरं कोसळलेल्यांचं पुढे काय?

गोविंद ठाकूर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : विलेपार्लेच्या (Vile Parle) इंदिरानगर (Indira Nagar) भागात रविवारी रात्री सात घरं नाल्यात कोसळली. या घरांमध्ये कुणीही नव्हतं, त्यामुळे थोडक्यात मोठी जीवितहानी टळली. दरम्यान, नाल्याला अगदी खेटून असणारी ही घरं कोसळतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद (Home Collapse Video) झालाय. इंदिरानगर-2च्या झोपडपट्टीमधील भागात ही घटना घडली. वेळीच या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. एकूण 7 घरं एका मागोमाग एक नाल्यात कोसळताना थरार प्रत्यक्षदर्शींनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. शनिवारीच यातील काही घरांना तडे गेले होते. दुपारपासून ही घरं कोसळू लागली होती. पण संध्याकाळी सात-साडे सात वाजण्याच्या सुमारास सातही घरं नाल्यात कोसळली. ज्या लोकांची ही घरं होती त्यांना जवळच्याच एका हॉलमध्ये ठेवण्यात आलं आहेत. बीएमसीकडून या लोकांची काळजी घेतली जातेय. राहतं घर कोसळून गेल्यानं तिथं राहाणाऱ्या लोकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पण जीव अगदी थोडक्यात वाचल्यानं सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडलाय. काहींनी मेट्रोच्या कामामुळे ही घरं पडल्याचा आरोप केलाय. तर काही जणांनी नाल्यात बाजूने माती जावू लागल्यानं ही घरं पडल्याचंही म्हटलंय. या संपूर्ण प्रकरणी बीएमसी आणि अग्निशमन दलाकडून पुढील तपास केला जातोय.

 

 

 

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI