AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या विलेपार्ले परिसरात 8 घरं कोसळली; मदत कार्य सुरु

रविवारी रात्री नऊच्या सुमारास या झोपडपट्टीतील आठ घरं कोसळळी. घटनेचे वृत्त कळताच पालिका अधिकारी आणि फायर ब्रिगेड चे जवान घटनास्थळी  दाखल झाले आहेत. मदतकार्य वेगाने सुरू आहे.

मुंबईच्या विलेपार्ले परिसरात 8 घरं कोसळली; मदत कार्य सुरु
| Edited By: | Updated on: Sep 26, 2022 | 2:16 AM
Share

मुंबई : मुंबईच्या विलेपार्ले(Vile Parle) परिसरात 8 घरं कोसळली आहेत. मुंबई महापालिकेच्या अग्नीशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी बचाव कार्य सुरु आहे.

विलेपार्ले पश्चिम येथील मिठीबाई कॉलेज जवळ ही घटना घडलेय. येथील इंदिरा नगर 2 येथील झोपडपट्टी मधील ही घरं आहेत. ही घरं नाल्यावर बांधलेली होती. मुंबई महापालिकेच्या सुचनेनुसार आधीच ही घरं रिकामी करण्यात आली होती. यामुळे या घरांमध्ये कुणीही नव्हते.

रविवारी रात्री नऊच्या सुमारास या झोपडपट्टीतील आठ घरं कोसळळी. घटनेचे वृत्त कळताच पालिका अधिकारी आणि फायर ब्रिगेड चे जवान घटनास्थळी  दाखल झाले आहेत. मदतकार्य वेगाने सुरू आहे.

या परिसराच्या जवळच मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे आजूबाजूच्या घरांना याचा फटका बसला आहे. धक्क्यामुळे ही घर कोसळली आहेत. नाल्यालगतची आणखी घरे कोसळू शकतात, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

सुदैवाने घर कोसळण्यापूर्वी सर्व घरे रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. पीडितांना जवळच्या हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे. बीएमसीने यांच्या निवासाची सोय केली आहे.

मेट्रोचे काम सुरू आहे, त्यामुळे घर पडल्याचे काही स्थानिकांचे म्हणणे आहे.  नाल्याच्या बाजूने माती जाऊ लागली होती. त्यामुळे ही माती सरकल्याने घर कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...