Vinayak Mete Passed Away : सुरक्षेत Ford Endeavour अव्वल, तरीही अपघात कसा? गाडीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
विनायक मेटेंच्या Ford Endeavour गाडीचा अपघात झाल्यानं अनेक प्रश्न उपस्थित केले जाताय. एन्डेव्हरन 37 गुणांपैकी 35.38 सुरक्षा गुण मिळवले आहेत. 5-स्टार ANCAP रेटिंग आहे. त्यामुळे गाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.
मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Passed Away) यांचं आज अपघातील निधन झालं. आज मुंबईमध्ये मराठा समन्वय समितीची बैठक होती. ही बैठक आज दुपारी बैठक होणार होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विनायक मेटे यांना बैठकीसाठी बोलावल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, विनायक मेटे मुंबईच्या (Mumbai) दिशेनं येत होते. याचवेळी पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. ही अपघाताची घटना खोपलीमधल्या बातम बोगद्याजवळ घडल्याची माहिती आहे. दरम्यान, विनायक मेटे यांच्या ज्या गाडीला अपघात झाला. ती Ford Endeavour कारविषयी आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. एन्डेव्हरने 37 गुणांपैकी 35.38 सुरक्षा गुण मिळवले आहेत.5-स्टार ANCAP रेटिंग प्राप्त आहे. फोर्डची SUV शिडीच्या फ्रेमवर आधारित आहे. असं असूनही विनायक मेटेंच्या गाडीचा अपघात झाल्यानं अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
Published on: Aug 14, 2022 02:45 PM
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
