Kirit Somaiya | विश्वास नांगरे पाटील भाजप नेते किरीट सोमय्यांच्या रडारवर

विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडीचे माफिया आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. 

नवी दिल्ली: महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोपांची राळ उठवून खळबळ उडवून देणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आता थेट सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावरच निशाना साधला आहे. विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडीचे माफिया आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या आज दिल्लीत आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना सोमय्या यांनी हा आरोप केला आहे. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे ठाकरे सरकारचे माफिया म्हणून काम करत आहेत. पाटील यांनी गैरकायदेशीरपणे मला घरात कोंडून ठेवले. सीएसटी स्टेशनच्या बाहेर कोंडून ठेवलं. ते सूचना देत होते. ते सीनियर पोलीस अधिकारी आहेत. एज्युकेटेड अधिकारी आहेत. परमबीर सिंग 100 कोटींच्या वसुलीत सहभागी झाले. यांचा एसीपी 50 लाखांची सुपारी घेतो. अन् नांगरे-पाटील हे माफिया सारखे वागत आहे, अशी टीका सोमय्या यांनी केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI