Jayant Patil | सरकार स्थिर आहे म्हणून आम्ही फिरतोय – जयंत पाटील

विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे युवक कॉग्रेस चे प्रदेशाध्यक्ष माहेबूब शेख यांचा आज दिवसभरासाठी पालघर दौरा सुरू आहे.

सरकार स्थिर आहे म्हणून आम्ही फिरतोय, सरकार अस्थिर असेल तर आम्ही मुंबईत राहून सरकार टिकविण्याचे आम्ही प्रयत्न केले असते, तशी आमच्यावर पाळी आणखी आली नाही, आमचे सरकार स्थिर आहे आणि आमचे तिन्ही पक्ष एकसंघपणाने काम करतात, भाजपावर टोला मारताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले आहे. विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे युवक कॉग्रेस चे प्रदेशाध्यक्ष माहेबूब शेख यांचा आज दिवसभरासाठी पालघर दौरा सुरू आहे. मुंबई अहमदाबाद महामार्ग तुंगारेश्वर फाटा येथील sheltar हॉटेल वसई विरार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याकर्त्यांची आढावा बैठक घेतली आहे. त्यावेळी tv9 शी संवाद साधताना जयंत पाटील बोलले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI