Kranti Redkar | जाळून टाकू, मारून टाकू, आम्हाला धमक्यांचे फोन येतात – क्रांती रेडकर

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरने पहिल्यांदाच मीडियासमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हाला जाळून टाकू, मारून टाकू, लटकवून टाकू अशा धमक्या आम्हाला दिल्या जात आहेत. आमच्या जीवाला धोका आहे, असं क्रांती रेडकरने सांगितलं.

क्रांती रेडकरने आज पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिने समीर वानखेडेंवरील आरोप फेटाळून लावतानाच त्यांना येत असलेल्या धमक्यांबद्दलचीही माहिती दिली. आम्हाला मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. ट्रोल केलं जातं. लटकवून टाकू, जाळून टाकून, मारून टाकू अशा धमक्या आम्हाला येत आहेत. मात्र समीर यांच्या जॉबबद्दल हे पार्ट अँड पार्सल आहे असं वाटतं, असं क्रांतीने सांगितले.

फेक अकाऊंटवरून आरोप होताहेत

त्यांच्या जीवाला धोका आहे. आम्हाला संरक्षण दिलं आहे. त्यामुळे सरकारचे आभारी आहोत. आमच्या कुटुंबाला धमकी दिली जात आहे. आमच्या जीवाला धोका आहे. आमच्याकडे कोणी पाहत असले तरी भीती वाटते. फेक अकाऊंटवरून आम्हाला धमकी दिली जात आहे. तुमची परेड करू, तुम्हाला जाळू अशा धमक्या दिल्या जात आहेत. आम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढले असून वेळ आल्यानंतर ते जाहीर करू, असंही त्यांनी सांगितलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI